पंचशील वार्डात युवासेनेची ताकद वाढली : युवकांचा शिवसेनेत प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर शहरातील पंचशील वार्डातील अनेक युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात राहुल समुद् यांची चंद्रपूर उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली.
युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे आणि चंद्रपूर जिल्हा विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पंचशील वार्डातील युवकांनी युवासेनेत प्रवेश केल्याने परिसरात संघटनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे. युवकांच्या हक्कांसाठी लढा देणे, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणे, यासाठी युवासेना कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युवकांचा वाढता प्रतिसाद हा संघटनेवरील विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या वेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर गभने, विवान रामटेके, तालुका समन्वयक पवन उडाके, शाहरुख शेख, चेतन जिराफे, कार्तिक महत्व, अतुल मिश्रा, आफ्रिद शेख, ऋषी बागडे, अंकित शुक्ला, गणेश राखुडे, रोशन पारोधी यांच्यासह अन्य युवासैनिक उपस्थित होते. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे युवासेना परिवारात स्वागत करण्यात आले.




Petrol Price




