महत्वाच्या बातम्या

 श्री ज्ञानेश महाविद्यालयात माजी अध्यक्ष श्री. रामराव पाटील बोरकर यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालय, येथे भारतीय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्री. रामराव पाटील बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

श्री रामराव पाटील बोरकर यांनी अनेक वर्षे भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. मनमिळावू, प्रेमळ आणि सहृदयी स्वभावाचे धनी असलेल्या बोरकर यांनी आपल्या कार्यातून अनेकांच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण यावेळी कृतज्ञतापूर्वक करण्यात आली.

या अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. लंजे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी स्वर्गीय श्री रामराव पाटील बोरकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.





  Print






Related Photos