आजचे दिनविशेष

१० ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८४६ : इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
१९११ : चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
१९१३ : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४२ : सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४४ : दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.
१९५४ : श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
१९६० : विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला
१९६४ : जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपग्रहांद्वारे थेट प्रक्षेपित केलेला पहिला आहे.
१९७० : फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
१९७५ : पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.
१९९८ : आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.
२००७ : शेख मुस्झाफर शुकोर - पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.
१९८६ : सॅन साल्वाडोर भूकंप - ५.७ मेगावॅटच्या सॅन साल्वाडोर भूकंपाने एल साल्वाडोरमध्ये किमान १,५०० लोकांचे निधन.
१९८० : एल अस्नाम भूकंप - ७.१ मेगावॅटच्या भूकंपाने उत्तर अल्जेरियामधे किमान २,६३३ लोकांचे निधन तर ८ हजार लोक जखमी.
१९८० : फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट - अल साल्वाडोरमध्ये स्थापना झाली.
१९७९ : ओल्किलुओटो अणुऊर्जा प्रकल्प, फिनलंड सुरवात.
१९६७ : बाह्य अवकाश करार (Outer Space Trity) - अंमलात आला.
१९५७ : विंडस्केल आग - ब्रिटनमधील सर्वात भीषण आण्विक अपघात.
१९११ : चीन - देशामधे किंग वंशाचा शेवट.
१९०३ : द वुमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन - ब्रिटिश महिलांच्या मताधिकाराच्या समर्थनार्थ स्थापना करण्यात आली.
१८६८ : दहा वर्षांचे युद्ध - क्यूबातील स्पॅनिश राजवटीविरुद्ध सुरू झाले.
१७८० : १७८०चे चक्रीवादळ - या वादळामुळे कॅरिबियनमध्ये किमान २० ते ३० हजार लोकांचे निधन.
१० ऑक्टोबर जन्म
१७३१ : हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)कॅलेंडर पहा
१८३० : स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.
१८४४ : रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.
१८७१ : निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)
१८७७ : मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९६३)
१८९९ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)
१९०२ : कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)नकाशे पहा
१९०६ : इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)
१९०९ : क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)
१९१० : हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.
१९१२ : भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)
१९१६ : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.
१९५४ : चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.
१९६६ : झाई झिगांग - स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती
१९४६ : भारतीय मुस्लिम विद्वान सलमान मझिरी यांचा जन्म (मृत्यू : २० जुलै २०२०)
१९३५ : पॅलेस्टिनी कमांडर, फताहचे संस्थापक खलील अल वझीर यांचा जन्म (मृत्यू : १६ एप्रिल १९८८)
१९३३ : भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचा जन्म (मृत्यू : १५ सप्टेंबर २०२०)
१९१५ : भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचा जन्म (मृत्यू : ११ मे २००९)
१८९९ : भारतीय इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक बलदेव उपाध्याय यांचा जन्म (मृत्यू : १० ऑगस्ट १९९९)
१८६१ : नॉर्वेजियन शास्त्रज्ञ, संशोधक - नोबेल पारितोषिक विजेते फ्रिडटजॉफ नॅनसेन यांचा जन्म (मृत्यू : १३ मे १९३०)
१० ऑक्टोबर मृत्यू
१८९८ : अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)कॅलेंडर पहा
१९११ : जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.
१९६४ : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)
१९८३ : मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.
२००० : श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)
२००५ : युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.
२००६ : शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)
२००८ : कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)
२०११ : गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)
२०२२ : भारतीय लेखक आणि कथाकार सुब्बू अरुमुगम यांचे निधन (जन्म: १२ जुलै १९२८)
२०२२ : उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री मुलामसिंह यादव यांचे निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९३९)
२०२१ : भारतीय-पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते अब्दुल कादीर खान यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९३६)
२०१५ : भारतीय अभिनेत्री आणि गायिका - पद्मश्री मनोरमा यांचे निधन (जन्म: २६ मे १९३७)
१९९७ : भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर यांचे निधन (जन्म: २४ सप्टेंबर १९१८)
१९०१ : अमेरिकन धार्मिक नेते, चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लेटर-डे सेंट्सचे ५वे अध्यक्ष लोरेन्झो स्नो यांचे निधन (जन्म: ३ एप्रिल १८१४)
१५८१ : बर्माचे राजा बेयिनौंग यांचे निधन (जन्म: १६ जानेवारी १५१६)




Petrol Price




