महत्वाच्या बातम्या

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


- १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत; पात्र खेळाडू व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२०२५ व सन २०२५-२०२६ या वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील उत्कृष्ट खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरविण्यात येते. इच्छुक व पात्र व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये ज्येष्ठ क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसाठी श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, तसेच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी अनुक्रमे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार यांचा समावेश आहे.

या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी निर्धारित मुदतीत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. पुरस्कारासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासंबंधीच्या सविस्तर अटी व शर्तींची माहिती घेऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे कार्यालय, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 





  Print






Related Photos