आजचे दिनविशेष १३ ऑक्टोबर


१३ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
५४: ५४ई.पूर्व : नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.ऑफर शोधा
१७७३ : चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४ : ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३ : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.
१९२९ : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
१९४४ : दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१९४६ : फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१९७० : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८३ : अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
२०१३ : मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.
२०१९ : ब्रिगिड कोसगेई - यांनी २:१४:०४ वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा महिला धावपटू म्हणून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०१६ : मालदीव - देशाने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
१९७६ : इबोला - या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला.
१९४३ : दुसरे महायुद्ध - इटलीने अधिकृतपणे जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले आहे.
१८९२ : एडवर्ड इमर्सन बर्नार्ड - यांनी फोटोग्राफिक पद्धतीने पहिला धूमकेतू शोधला.
१८८५ : जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - स्थापना झाली.
१८४३ : बेनाई बिरथ इंटरनॅशनल - जगातील सर्वात जुनी ज्यू सेवा संस्था स्थापन झाली.
१८२१ : मेक्सिकन साम्राज्य - स्वातंत्र्याची घोषणा सार्वजनिकरित्या करण्यात आली.
१७९२ : व्हाईट हाऊस - या अमेरिकन प्रेसिडेंट यांच्या अधिकृत निवासस्थानाची कोनशिला घातली गेली.
१३ ऑक्टोबर जन्म
१८७७ : स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)कॅलेंडर पहा
१९११ : चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)
१९२४ : भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)
१९२५ : ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)
१९३६ : भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)
१९४१ : इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्नो यांचा जन्म.
१९४३ : सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.
१९४८ : पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)
१९३० : भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचा जन्म (मृत्यू : ४ सप्टेंबर २०१२)
१३ ऑक्टोबर मृत्यू
१९६५ : डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ - ओल्टेन, स्वित्झर्लंड)
१२४० : दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.
१२८२ : जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२)
१९११ : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८६७)
१९३८ : पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९४)
१९४५ : द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
१९८७ : पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९९५ : हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे १९१५ - किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)
२००१ : कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.
२००३ : नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.
२०१८ : भारतीय सुरबहार (बास सितार) वादक - पद्म भूषण अन्नपूर्णा देवी यांचे निधन
१९९३ : तुर्की देशाचे माजी अध्यक्ष टेकीं रिबूरून यांचे निधन (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)




Petrol Price




